




Welcome to Disaster Management Rescue Organization
आपत्ती बचाव व्यवस्थापन संस्था
श्री रणवीर लक्ष्मण जाधव
संस्थापक / अध्यक्ष
About Us
आपत्ती म्हणजे ज्या संकटामुळे आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि आर्थिक हानी तसेच सामाजिक हानी होत असते. त्याचबरोबर राष्ट्रावर किंवा समाजावर या पद्धतीचे खूपच दूरगामी परिणाम होत असतात. अशा संकटाला आपत्ती असे बोलले जाते.
तथापी आपत्ती व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्तीपासून निर्माण झालेले नुकसान भरुन काढणे, तात्काळ शक्य होत नाही.. तरी शक्य ती अपादग्रसतांना आवश्यक ती मदत करणे..व्यवस्थापनामध्ये आपत्ती विषयक परिस्थितीवर नियंत्रण करणे, धोकेदायक परिस्थिती निवळणे,आणि त्याचे निराकरण करणे म्हणजे ‘आपत्ती व्यवस्थापन’ होय.
हे सर्व आपण जाणताच..
संस्थेचे उद्देश :-
✓ रस्ते, महामार्गावरील होणाऱ्या अपघातामधील अपघातग्रस्त लोकांना विनामूल्य तात्काळ आवश्यक ती मदत करणे.
✓ कार्य क्षेत्रात होणाऱ्या अपघातांमुळे वेळेत मदत न मिळाल्याने जीवितहानी होण्याच्या शक्यतेमुळे अपघात नियंत्रण पथक तयार करून अपघात प्रवण क्षेत्रात गस्त घालणे व महामार्गावरील गरजूना शक्य ती मदत पुरवणे.
✓ अपघात समयी व आपत्ती समयी वाहतूक नियोजन व नियंत्रण करणेकामी स्थानिक प्रशासना सोबत मदत कार्यात तसेच बचाव कार्यात मदत करणे.
✓ रस्ते, महामार्ग शहर यामध्ये बेवारस असणाऱ्या चारचाकी आणि दुचाकी यांची माहिती प्रशासनास देणे.
✓ नैसर्गिक आपत्तीग्रस्त लोकांना योग्य ती मदत पुरवणे, भूकंप वादळ, आग महापूर यात सापडलेल्या आपत्तीग्रस्त जनतेस त्यांचे पुनर्वसन करणेकामी मदत पुरवणे.
✓ समाजातील उपेक्षित गरजू लोकांना शक्य ती वैद्यकीय मदत पुरवणे त्यासाठी विविध आरोग्य तपासणी शिबीरे शस्त्रक्रिया शिबीरे रुग्णालये रुग्णवाहीका याची सोय करून देणे.
✓ समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या शैक्षणिक विकासाकरिता समाजात क्रमिक, पारंपरिक आधुनिक तांत्रिक व भाषिक शिक्षणाची सोय करण्याच्या दृष्टीकोनातून मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम विद्यालय महाविद्यालयात सैनिकी प्रशिक्षण निवासी विद्यालयाची निर्मिती करणे,
✓ शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना शिक्षण तसेच ज्ञानाचा दर्जा उंचवण्याकरिता सेवभावाने विविध चर्चासत्रे परिसंवाद प्रशिक्षण शिबीरांचे आयोजन करणे.
✓ समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेला भ्रष्टाचार तसेच परिस्थिती नुसार उदभवलेली समाजातील स्तिथी यांचा विचार करून जनते करिता न्यायिक हक्काच्यासाठी अन्यायाविरोधात समाजहिताचा व. देशहिताचा विचार करून व्यवस्था वा प्रशासनाकडून जनते करिता न्यायाची मागणी करणे.
✓ शिक्षण कला व क्रीडा यांचा प्रचार व प्रसार करणेकामी क्रीडागणे व्यायामशाळा, नेमबाजीसाठी प्रगत तंत्रज्ञानयुक्त क्रीडा संकुल तयार करणे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन व्यक्तीमहत्व विकासाकरिता प्रतिभावान खेळाडूंना प्रशिक्षण देणे.
✓ समाजातील अनिष्ट प्रथा अंधश्रद्धा निरक्षरता व्यसनाधीनता कुटुंब कल्याण पर्यावरण सामाजिक सुरक्षा महिला सुरक्षा या करिता कार्याशाला शिबीर स्थापन करणे.
✓ कार्यक्षेत्रातील समाजात असणाऱ्या बालके विध्यार्थी युवक युवती महिला जेष्ठ नागरिक यांच्याकरिता सेवाभावी उपक्रम राबवणे, महिला स्वरक्षण व्यक्तिमहत्व विकास कार्यक्रमाअंतर्गत आत्मरक्षा कराटे किकबॉक्सिंग सारख्या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणे व प्रशिक्षण देणे.
Rescue Operations

















आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या काळात आणि त्यानंतर, जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान कमी करण्यासाठी तसेच समाजाला पूर्ववत करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना. यामध्ये आपत्ती येण्यापूर्वीची तयारी, आपत्तीच्या काळात दिला जाणारा प्रतिसाद आणि आपत्तीनंतरची पुनर्प्राप्ती यांचा समावेश होतो.
आपत्ती व्यवस्थापनाचे महत्त्व:
आपत्तींमुळे होणारे नुकसान कमी करणे, लोकांचे जीवन आणि मालमत्ता यांचे संरक्षण करणे, समाजाला लवकर पूर्ववत करणे, भविष्यात येणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहणे.
नैसर्गिक आपत्ती:
नैसर्गिक आपत्ती म्हणजे ज्या नैसर्गिक घटनांमुळे उद्भवतात, जसे की: भूकंप: पृथ्वीच्या पृष्ठभागाखालील हालचालींमुळे येणारे हादरे. पूर: नद्या किंवा समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन जमिनीवर पसरणे. चक्रीवादळ/वादळ: जोरदार वाऱ्यासह पाऊस, ज्यामुळे मोठे नुकसान होते. Drought / दुष्काळ: पाण्याची तीव्र कमतरता. ज्वालामुखीचा उद्रेक: ज्वालामुखीच्या मुखातून बाहेर पडणारा लाव्हा, राख आणि वायू. सुनामी: समुद्रात येणाऱ्या मोठ्या लाटा. भूस्खलन: डोंगराचा किंवा जमिनीचा भाग खचणे. नैसर्गिक वणवा: जंगलात किंवा गवताळ प्रदेशात लागलेली आग. मानवनिर्मित आपत्ती: मानवनिर्मित आपत्ती म्हणजे मानवी कृतींमुळे किंवा चुकांमुळे घडणाऱ्या घटना, जसे की: औद्योगिक अपघात: रासायनिक किंवा औद्योगिक प्रकल्पांमध्ये होणारे अपघात. प्रदूषण: हवा, पाणी किंवा जमिनीचे प्रदूषण. दहशतवादी हल्ले: लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे हल्ले. युद्ध: दोन किंवा अधिक देशांमध्ये होणारे सशस्त्र संघर्ष. अणुऊर्जा प्रकल्प अपघात: अणुऊर्जा प्रकल्पात होणारे अपघात. या दोन्ही प्रकारच्या आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि त्रास होतो, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे.
आपत्ती व्यवस्थापनाची पहिली पायरी म्हणजे धोक्याची ओळख आणि जोखीम मूल्यांकन. या पायरीमध्ये, संभाव्य आपत्तींची कारणे आणि त्यांची तीव्रता तसेच त्यावर होणारे परिणाम यांचा अभ्यास केला जातो.
आपत्ती व्यवस्थापनाच्या इतर टप्प्यांमध्ये हे समाविष्ट आहे:
प्रतिबंध:
धोक्यांची तीव्रता कमी करण्यासाठी उपाययोजना करणे.
तयारी:
आपत्कालीन परिस्थितीत प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी योजना तयार करणे.
प्रतिसाद:
आपत्कालीन परिस्थितीत लोकांना वाचवणे आणि मदत करणे.
पुनर्प्राप्ती:
सामान्य स्थितीत परत येण्यासाठी उपाययोजना करणे. या पायऱ्यांच्या योग्य अंमलबजावणीमुळे आपत्तींमुळे होणारे नुकसान कमी करता येते.
आपत्कालीन परिस्थितीच्या सर्व मानवतावादी पैलूंशी निगडीत संसाधने आणि जबाबदाऱ्यांचे व्यवस्थापन, विशेषत: तयारी, प्रतिसाद आणि आपत्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी पुनर्प्राप्ती ही आपत्ती व्यवस्थापन होय.
अपघात.. हा शब्द अगदीच अचानक आणि अकल्पीत असं काही घडणं या अर्थाने आपल्याकडे आलेला आहे मात्र रस्त्यावर घडणारे अपघात आणि अपघातांच्या मालिका बघितल्यावर मनाला आतून बाहेरुन धक्का बसतो.
आपल्याकडील अपघातांची कारणमिमांसा करताना जाणवतं की आपली बेशिस्त वृत्ती आणि बेदरकारपणा, शिस्त न पाळणे आदी अनेक कारणांनी आपल्याकडे अपघात होतात. अपघात यांत्रिक दोषाने होण्यापेक्षा ते अधिक प्रमाणात होतात मानवी दोषाने हे चुकीचेच आहे. आपल्याकडे होणाऱ्या अपघातात दरवर्षी 1 लाख 50 हजारांहून अधिक जण प्राण गमावतात. यात सर्वाधिक अपघात हे दुचाकी वाहनांचे आहेत. भरधाव वेगात गाडी चालविणे अनेकांना आवडते मात्र अशा स्थितीत सुरक्षा साधनांचा वापर करणे अत्यावश्यक असते.
एखाद्या यांत्रिक चुकीने गाडीचा तोल जाणे, संतुलन बिघडणे, नियंत्रण सुटणे तसेच रस्त्यात अचानक वाहनासमोर कुणी येणे अशा स्थितीत अपघात हा टाळताच येत नाही. अशा वाहनाचालकाने किमान हेल्मेट घातलेले असेल तरी नुकसान कमी प्रमाणात होते. किमान प्राण वाचण्याची शक्यता यात असते.
वाहन चालकांमध्ये वाहनाचे पूर्ण ज्ञान नसणे तसेच वाहतूक नियमांची पूर्ण माहिती नसणे आणि मुळातच वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देखील घेतलेले नसणे ही भारतात होणाऱ्या अपघातांमागील काही महत्वाची कारणे आहेत.दुचाकी वाहनधारकांना हेल्मेट वापरण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काही शहरात झाली याला सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. आपली नियम झुगारुन देण्याची किंवा नियम न पाळण्याची मानसिकता यामागे आहे असे म्हणायला काहीच हरकत नसावी.
जगात इतर देशात अपघाती मृत्यूंचे प्रमाण कमी आहे याला कारण म्हणजे अपघात होऊ नये यासाठी उत्तम खबरदारी घेतली जाते. नियम हे आपल्या सुरक्षेसाठी आहेत अशी भावना शालेय स्तरापासून प्रत्येकात रुजलेली आपणास दिसते आपण अपघात बघितल्यावर हळहळ व्यक्त करतो आणि कामाला लागतो. पुढच्यास ठेस मागचा शहाणा ही वृत्ती आपल्या कृतीत येत नाही त्यामुळे ये रे माझ्या मागल्या म्हणत बेदरकारपणे सर्व जण वाहने हाकतात. कुठंतरी थांबून विचार करा. आयुष्य इतकही स्वस्त आहे. बघा… समजून घ्या आणि सावध रहा.
अपघात म्हणजे अनियोजित, अनपेक्षित आणि अनपेक्षित घटना असतात ज्यांमुळे धोका निर्माण होतो.
अपघात नियंत्रण नियम:
- वाहतूक नियम पाळा:
लाल सिग्नलवर थांबा, ओव्हरटेक करताना योग्य खबरदारी घ्या, आणि लेन बदलताना इंडिकेटरचा वापर करा.
वेगमर्यादेचे पालन करा आणि मद्यपान करून गाडी चालवू नका.
नेहमी सीट बेल्ट (seat belt) लावा. - वाहनांची नियमित देखभाल:
तुमच्या वाहनाचे टायर, ब्रेक, आणि लाईट नियमितपणे तपासा.
योग्यरित्या फुगलेले टायर वापरा आणि त्यांची नियमित तपासणी करा.
ब्रेक आणि स्टीयरिंगची तपासणी करा, कारण खराब झालेले ब्रेक आणि स्टीयरिंग अपघात होऊ शकतात. - धोकादायक परिस्थितीत सावध राहा:
खराब हवामान किंवा कमी दृश्यमानतेमध्ये (visibility) जास्त सावधगिरी बाळगा.
रस्त्यावर असलेल्या चिन्हे आणि सूचनांचे पालन करा.
जास्त वेगाने गाडी चालवू नका. - इतर:
mobile phone चा वापर टाळा.
रस्त्यावर लक्ष केंद्रित करा.
गरज वाटल्यास, मदतीसाठी 100 किंवा 108 क्रमांकावर संपर्क साधा.
अपघात झाल्यास, जखमींना मदत करा आणि पोलिसांना कळवा.
